crossorigin="anonymous"> श्री रूपाभवानीची सीमोल्लघन पालखी मिरवणूक भक्तिभावात – Swarajya News Marathi

श्री रूपाभवानीची सीमोल्लघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

0
श्री रूपाभवानीची सीमोल्लघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

सोलापूर- येथील रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. गुरुवारी, विजयादशमीनिमित्त पहाटे काकड आरती, महानवमीनिमित्त देवीस अलंकार महापूजा करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, उद्योजक सुधीर थोबडे, संदेश भोगडे, संदेश भोगडे, राजशेखर चडचणकर, सकलेश विभुते, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.

सायंकाळी श्रीदेवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन सार्वजनिक सीमोल्लंघन करण्यात आले. शमी पूजनासाठी ही पालखी मंदिरातून तुळजापूर वेसमार्गे, पार्क चौक येथून हुतात्मा पुतळ्याजवळील शमी वृक्षाजवळ वाजत-गाजत आणण्यात आली. यावेळी शमी वृक्षाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. आई राजा उदो… उदोच्या गजरात प्रदक्षिणा घालून पालखी पूजन करण्यात आली. त्यानंतर सोने वाटून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शेवटी मसरे गल्ली येथील अंबिका देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर भोगडे गल्ली येथील कसबा देवीची (फिरकी अंबाबाई) भेट होऊन आरती करण्यात आली. पालखी मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी प्रसाद वाटण्यात आले. त्यांनतर पालखी पुन्हा रुपाभवानी मंदिरात नेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!