crossorigin="anonymous"> दोन हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला डीजेमुक्त सोलापूरचा नारा – Swarajya News Marathi

दोन हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला डीजेमुक्त सोलापूरचा नारा

0
दोन हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला डीजेमुक्त सोलापूरचा नारा

सोलापूर : सोलापुरात कायमस्वरूपी १०० टक्के डीजेवर बंदी आणावी या मागणीकरिता गुरुवारी सोलापुरातील विविध १२ शाळा महाविद्यालयातील २ हजार विद्यार्थी – विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला. डीजेमुक्त सोलापूर व्हावे याकरिता गुरुवारी सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली.

गुरुवारी प्रारंभी मानवी साखळीच्या मार्गावरील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या मूर्तीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास तसेच सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवी साखळीस प्रारंभ झाला.

या मानवी साखळीमध्ये संगमेश्वर महाविद्यालय, सुयश विद्यालय, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूल, रॉजर्स स्कूल, मेरी बी हार्डिंग स्कूल, हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सेवासदन प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला अशा १० शाळा आणि महाविद्यालये सहभागी झाली होती.

सात रस्ता येथून प्रारंभ झालेली मानवी साखळी रंगभवन, होम मैदान, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे चार हुतात्मा पुतळा परिसरापर्यंत तयार करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डीजे मुक्त सोलापूर झालेच पाहिजे, बंद करा बंद करा कर्णकर्कश डीजे बंद करा अशा घोषणा दिल्या. तसेच डीजे मुक्त सोलापूर झाले पाहिजे या मागणीचे फलक हाती धरले होते.

भर पावसात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक

गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही पावसाला न जुमानता डीजेमुक्त सोलापूरसाठी सरसावलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींचे सोलापूरकरांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!