crossorigin="anonymous"> सोलापूरचा नदीम शेख महाराष्ट्र संघात – Swarajya News Marathi

सोलापूरचा नदीम शेख महाराष्ट्र संघात

0
सोलापूरचा नदीम शेख महाराष्ट्र संघात

सोलापूर : येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू, तेज मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजी संभाव्य संघात निवड झाली असून हा संघ येत्या ४ सप्टेंबर पासून KSCA अर्थात कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने बेंगलोर येथील निमंत्रित ४ दिवसीय क्रिकेट सामने स्पर्धेत सहभागी होणार असून या संघाचे नेतृत्व रणजी खेळाडू मंदार भंडारी करणार आहे.

उजव्या हाताचा गोलंदाज असलेला सोलापूरचा नदीम शेख हा गेले ३ वर्षे जिल्हा संघाकडून उत्तम कामगिरी करत असल्याने त्याची रणजी संभाव्य संघ आणि सराव शिबिर साठी निवड होत असून मागील वर्षी देखील KSCA आयोजित इंडिया डॉ.(कॅप) के. थिम्मापैयाह मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. तसेच यावर्षी देखील वरिष्ठ गटाच्या मुलांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याकडून उत्तम कामगिरी केली तसेच सोलापुरात डी बी देवधर क्रिकेट स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केल्याने नुकतेच पुणे येथे झालेल्या रणजी सराव शिबिरासाठी त्याची निवड करण्यात आली होती. येथील सराव शिबिरातून चेन्नई तसेच बंगलोर येथील स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ सहभागी झाले असून 2025-26 ह्या आगामी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी चषक साठी यातून महाराष्ट्राचा मुख्य संघ निवडला जाणार असून त्याची पूर्व चाचणी/तयारी म्हणून ह्या स्पर्धेकडे पाहण्यात येते.
महाराष्ट्र संघ हा KSCA प्रेसिडेंट संघ तसेच गोवा व विदर्भ संघांसमवेत या स्पर्धेत सामने खेळणार असून 25 दिवसांच्या ह्या स्पर्धेसाठी संघ बंगलोर येथे पोहोचला आहे.

नदीम शेख याच्या निवडी बद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सचिव खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने यांनी विशेष अभिनंदन केले असून व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे आणि संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु तसेच इतर पदाधिकारी यांनी नदीमला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!